जपायच्या असतात
गोड आठवणी
ह्रुदयाच्या आतल्या कप्प्यात
कारण.........
त्याच देतात दिलासा
आयुष्याचा पडत्या काळात
सोसायच्या असतो विरह
भावस्पर्शी मनाच्या गाभारयात
कारण.........
तोच असतो प्रकाश
कालोखत
Saturday, January 5, 2008
मी मात्र तिथे नसेन
प्रेम गितांचे स्वर एकशील
आठवून मला तू रडशील
आठवण तुझ्या हृदयात असेल
मी मात्र तिथे नसेन
दूर एकांतात कधी जाशील
जलशयात मला पाहशील
शेजारची जागा रिकामीच असेल
जलशयात मला पाहशील
शेजारची जागा रिकामीच असेल
मी मात्र तिथे नसेन
एकटीच पाहून तुला हसतिल
गीत माझे तुझ्याबरोबर असेल
मी मात्र तिथे नसेन
मेघ दुःखाचे भरून येतील
तारा मनाच्या तू छेडशील
सुर त्यात माझाच असेल
सुर त्यात माझाच असेल
मी मात्र तिथे नसेन
Posted by KPramod at 7:49 PM 1 comments
Labels: Sad mood
Wednesday, January 2, 2008
नाजुकता
नाजुकता ऐसी कुणी, पाहीली नाही कधी
नजरही आम्ही तीच्यावर, टाकली नाही कधी
भय आम्हा नाजुकतेचे, हेच होते वाटले
भारही नजरेतला, सोसेल नव्हते वाटले
टाकीसी हलुवार अपुली, नाजुक इतुकी पाऊले
टपकती हलकेच जैसी, पारीजाताची फुले
नाजुकता जाणून आम्ही, आधीच होती बीछ्विल
पायातली केंव्हाच तुज्ह्या, वीकल हृदये आपुली
Posted by KPramod at 7:34 PM 0 comments
Subscribe to:
Posts (Atom)